अ‍ॅपशहर

आता रविवारीही अतिक्रमण मोहीम

महापालिका प्रशासानाने शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर असलेल्या हॉकर्सविरुध्द महापालिकेने गेल्या सहा महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण विभागाला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. आता यापुढे सुटीच्या दिवशी देखील अतिक्रमण विभाग सुरू राहणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र पथकांची नियुक्त करण्यात आल्याची माह‌िती अतिक्रमण अधीक्षक ए.एम.खान यांनी दिली आहे.

Maharashtra Times 4 Mar 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम enchrochment on sunday
आता रविवारीही अतिक्रमण मोहीम


महापालिका प्रशासानाने शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर असलेल्या हॉकर्सविरुध्द महापालिकेने गेल्या सहा महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण विभागाला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. आता यापुढे सुटीच्या दिवशी देखील अतिक्रमण विभाग सुरू राहणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र पथकांची नियुक्त करण्यात आल्याची माह‌िती अतिक्रमण अधीक्षक ए.एम.खान यांनी दिली आहे. जळगाव शहरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मध्यवर्ती भागापर्यंत मर्यादीत असलेले हॉकर्सचे अतिक्रमण हे आता मुख्य रस्ते व उपनगरांपर्यंत पोहचले आहे. शहरातील महाबळ ते बसस्थानक, बसस्थानक ते शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा ते नेहरु चौक, गणेश कॉलनी स्टॉप ते कोर्ट चौक बसस्थानक ते एम. जे. कॉलेज चौक या मु्ख्य रस्त्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात हातगाड्या, टपऱ्या, विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात नेहरू चौक ते टॉवर चौक, टॉवर चौक ते घाणेकर चौक, शिवाजी पुतळा ते चित्रा टॉक‌ीज चौक, सुभाष चौक परिसर, पोलन पेठ, दाणाबाजार रस्ता या ठिकाणी तर रस्त्यांचा अक्षरश: बाजार झाला आहे. यातच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीनेदेखील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वर्दळीच्या ठिकाणच्या हॉकर्स स्थलांतराची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.

दोन पथके तैनात

सध्या शहरात सकाळ १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रांत शहरात अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे. असे असतानाही सुटीच्या दिवशी कार्यालय बंद असल्याने शहरात हॉकर्स कुठेही हातगाड्या लावत असल्याने सुटीच्या दिवशीदेखील अतिक्रमण विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक मुकादम, एक चालक व ८ कर्मचारी अशी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रात्रीदेखील पथकांकडून कारवाई केली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज