अ‍ॅपशहर

नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव तालुक्यातील कानळदा गावातील शेतकरी सुभाष धुडकू पाटील (वय ४८) यांनी नैराश्यातून गळफास घेतल्याची घटना बुधवारी (दि. ७) सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

Maharashtra Times 8 Feb 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer suicide


जळगाव तालुक्यातील कानळदा गावातील शेतकरी सुभाष धुडकू पाटील (वय ४८) यांनी नैराश्यातून गळफास घेतल्याची घटना बुधवारी (दि. ७) सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

सुभाष पाटील हे मंगळवारी (दि. ६) रात्री घराबाहेर पडले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. बुधवारी (दि. ७) सकाळी ८ वाजता हेमराज आनंदा राणे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला स्वत:चे शर्ट बांधून पाटील यांनी गळफास घेतल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, राजेंद्र बोरसे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सुभाष पाटील यांची ३० आर हेक्टर जमीन आहे. ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पत्नी रेखाबाई ह्या गृहिणी तर मोठा मुलगा संदीप हा दुचाकीच्या शोरुममध्ये, लहान मुलगा सचिन हा बिगारी काम करतो, त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. उत्पन्न, रोजगार कमी असल्यामुळे पाटील हे आर्थिक चणचण सोसत होते. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते. अशा परिस्थितीत नैराश्य आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज