अ‍ॅपशहर

शेतकरी सभासदांनी खाते ‘आधार’ जोडावे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अन्वये कर्ज माफी योजनेच्या कामकाज विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी कर्जदार शेतकरी सभासदांनी त्यांचे बँक खाते क्रमांक आधार कार्डशी जोडणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १६) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत केले.

Maharashtra Times 17 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers linking adhaar card with banking account
शेतकरी सभासदांनी खाते ‘आधार’ जोडावे


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अन्वये कर्ज माफी योजनेच्या कामकाज विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी कर्जदार शेतकरी सभासदांनी त्यांचे बँक खाते क्रमांक आधार कार्डशी जोडणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १६) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत केले. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली.

महाऑनलाइन यांनी उर्वरित ऑनलाइन अर्ज तत्काळ भरून घ्यावे. बँकांनी/विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी कर्जदार शेतकऱ्यांची माहिती १ ते ६६ नमुन्यांमध्ये २० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत भरावी. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांच्या आधार कार्डअभावी १ ते ६६ नमुन्यांमध्ये माहिती भरण्यास अडचण येत असल्यास बँकांनी त्यांचे सभासद शेतकऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ आधार नंबर प्राप्त करून घ्यावे. याबाबतची माहिती संगणकावर भरण्यासाठी संगणक व संगणक चालकांची संख्या अपुरी असल्याने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीत असलेले संगणक व संगणकचालक हे वि. का. सोसायटी, जिल्हा बँक कर्मचारी, सहाय्यक निबंधक व त्यांचे संबंधित यंत्रणेला उपलब्ध करून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज