अ‍ॅपशहर

यूपीएससीमधील यशवंतांचा बुधवारी सत्कार

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम निकालातील यशवंतांचे व पालकांच्या सत्काराच्या दीपस्तंभ यशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे बुधवारी (दि. ७) सकाळी साडेनऊ वाजता कांताई सभागृहात करण्यात आले आहे.

Maharashtra Times 6 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम felicitation upsc toppers on wednesday at jalgaon
यूपीएससीमधील यशवंतांचा बुधवारी सत्कार


केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम निकालातील यशवंतांचे व पालकांच्या सत्काराच्या दीपस्तंभ यशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे बुधवारी (दि. ७) सकाळी साडेनऊ वाजता कांताई सभागृहात करण्यात आले आहे.

समारंभात महाराष्ट्रातील पहिली महिला प्रज्ञाचक्षू आयएएस प्रांजल पाटील या ‘माझ्या अदम्य जिद्दीची कहाणी’ या विषयाने आपला प्रवास मांडणार आहेत. तसेच यावर्षी उत्तीर्ण झालेले सौरभ सोनवणे, डॉ. आशिष पाटील, डॉ. कुलदीप सोनवणे, महेश चौधरी यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे उपस्थित राहणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज