अ‍ॅपशहर

पंधरा किलो गांजा जप्त

शिरपूर येथून पुण्याकडे जाणारे एक वाहन अवधान टोल नाक्याजवळ एलसीबीच्या पथकाने पकडून अंदाजे १५ किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. २३) सकाळी झालेल्या कारवाईत पुण्याच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Maharashtra Times 24 Jun 2018, 5:00 am
धुळे एलसीबी पथकाची कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fifteen kg of ganja seized by dhule police at shirpur
पंधरा किलो गांजा जप्त


म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिरपूर येथून पुण्याकडे जाणारे एक वाहन अवधान टोल नाक्याजवळ एलसीबीच्या पथकाने पकडून अंदाजे १५ किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. २३) सकाळी झालेल्या कारवाईत पुण्याच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एलसीबीच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून पुण्याकडे होणारी गांजा तस्करी उघडकीस आणली असून, गांजा तस्करी प्रकरणी पुण्यातील एकास अटक केली आहे. यामध्ये उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. धुळे मार्गे पुण्याकडे एका वाहनातून गांजा तस्करी होत असल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह महामार्गावरील अवधान टोल नाक्याजवळ सापळा लावला होता. संशयित काळ्या रंगाची चारचाकी येताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्यात अंदाजे १५ किलो गांजा मिळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला असून, वाहनासह आसिफ मजीद सातारकर (वय ३२ रा. कोंडवा जि. पुणे) ताब्यात घेतले आहे. सातारकर याची चौकशी सुरू असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम दुपारी उशीरापर्यंत सुरू होते.

तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत?
या गांजा जप्तीच्या धडक कारवाईनंतर आता अनेक प्रश्नांना वाट मोकळी झाली असून, हा गांजा कुठे जात होता? कुठून आणला होता? कधी पासून गांजा तस्करी सुरू होती या सर्व प्रश्नांबाबत एलसीबीने चौकशी सुरू केली आहे. या गांजा तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहे, याचाही पोलिस तपास करीत आहेत. अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय हेमंत पाटील, एपीआय भाबड, हवालदार प्रभाकर बैसाणे, मनोज बागूल, अशोक पाटील, उमेश पवार, रवी राठोड, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज