अ‍ॅपशहर

कर्जमाफी योजनेंतर्गत आजपासून नोंदणी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अर्ज नोंदणीस आज (दि. २४) सुरुवात होत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतीच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Maharashtra Times 24 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fill application online for farmers waiver
कर्जमाफी योजनेंतर्गत आजपासून नोंदणी


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अर्ज नोंदणीस आज (दि. २४) सुरुवात होत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतीच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कर्जमाफी योजनेंतर्गत करावयाच्या अर्जाचा नमूना जाहिरात स्वरुपात वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचा असून, अर्ज भरताना शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नसेल परंतु त्यांनी नोंदणी केली असेल तो नोंदणी क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही प्रशासनाने कळवले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात महाऑनलाइनची १७७, सी. एस. सी. एस. पी. व्ही. ची ७०० तर आपले सरकार वेब पोर्टलची ८६९ केंद्रे उपलब्ध केली आहेत. कर्जमाफी अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असले तरी ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु, त्यांना आधार कार्ड काढून बँक सीडिंग केल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज