अ‍ॅपशहर

फटाके विक्रेत्यांना अग्निशमनची नोटीस

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने जळगाव शहरातील फटाक्यांच्या दुकानांची तपासणी केली. अग्निशमनच्या नियमानुसार दुकानांवर आवश्यक साहित्य आहे की नाही याची चाचपणी करण्यात आली.

Maharashtra Times 19 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम firebrigade notice to twelve firecrackers at jalgaon
फटाके विक्रेत्यांना अग्निशमनची नोटीस


महापालिकेच्या अग्निशमन विभागाने जळगाव शहरातील फटाक्यांच्या दुकानांची तपासणी केली. अग्निशमनच्या नियमानुसार दुकानांवर आवश्यक साहित्य आहे की नाही याची चाचपणी करण्यात आली. ज्याठिकाणी पूर्तता आढळून न आल्याने शहरातील १२ फटाके विक्रेत्यांना अग्निशमन अधिकारी यांनी नोटीस बजावल्या आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून दिवाळी पर्व सुरू झाल्याने जळगाव शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. शहरातील शिवतीर्थ मैदानावर अनेकांनी फटाक्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच शहरातील पुष्पलता बेंडाळे चौक ते सुभाष चौकापर्यंतदेखील दुकानांमध्ये बॉक्स व सुट्या फटाक्यांची विक्री केली जात आहे. प्रांताधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन हे स्टॉल लावण्यात आले आहेत.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख वसंत कोळी व त्यांच्या पथकाने बेंडाळे चौक ते सुभाष चौक परिसरात असलेल्या फटाक्यांच्या दुकानांची बुधवारी (दि. १८) तपासणी केली. यावेळी त्यांनी या दुकानांमध्ये अग्निशमनच्या नियमानुसार आवश्यक ती साहित्य तसेच अग्निशमनसाठी लागणारी यंत्रणा आहे की, नाही याची खात्री केली. यावेळी या भागातील १२ दुकानांमध्ये पूर्तता नसल्याने त्यांना त्याचठिकाणी नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. तसेच तत्काळ ही पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज