अ‍ॅपशहर

आयुक्तासह लिपिकास लाच घेताना अटक

मत्स्यपालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी. तसेच उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मत्स्यविभागाच्या सहाय्यक आयुक्तासह लिपीकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २५) दुपारी १.३० वाजता सापळा रचून अटक केली.

Maharashtra Times 26 Sep 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fisher department commissioner arrested for taking bribe with clerk at jalgaon
आयुक्तासह लिपिकास लाच घेताना अटक


मत्स्यपालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी. तसेच उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मत्स्यविभागाच्या सहाय्यक आयुक्तासह लिपीकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २५) दुपारी १.३० वाजता सापळा रचून अटक केली.

यातील तक्रारदार यांचा मत्स्यव्यवसाय असून त्यांनी वाघूर धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनाचे कंत्राट घेतलेले आहे. या मत्स्यपालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी. अहवाल देण्याच्या मोबदल्यात प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार जगनाथ धडील (वय ५५, रा. मुकूंद अपार्टमेंट, फ्लॅट नं. ६, शिखरेवाडी, नाशिक) व लिपीक रणजीत हरी नाईक (वय ४९, रा. रायसोनीनगर, जळगाव) या दोघांनी मंगळवारी त्यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी दुपारी १ वाजता मत्स्य विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचतधडील व नाईक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच दोघांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाची आत्महत्या
जळगाव : वाल्मीकगरातील किशोर ज्ञानेश्वर कोळी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी चार वाजता उघडकीस आली. किशोर हा हातमजुरीचे काम करीत होता. दरम्यान, बुधवारी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील कामावरुन घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी परिसरातील तरुणांना माहिती देत किशोर याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज