अ‍ॅपशहर

'स्वाइन फ्लू'मुळे वनरक्षकाचा मृत्यू

वन विभागातील वनरक्षक व शहरातील हिरापुर रोड भागातील रहिवाशी नितीन अमरसिंग चव्हाण यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यांचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Maharashtra Times 27 Sep 2017, 4:00 am
चाळीसगाव : वन विभागातील वनरक्षक व शहरातील हिरापुर रोड भागातील रहिवाशी नितीन अमरसिंग चव्हाण यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यांचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वनविभागात वनरक्षक म्हणून नोकरीस असलेले व हिरापूर रस्त्यावरील नवीन नाका परिसरातील रहिवाशी यांना तीन आठवड्यांपूर्वी खोकल्याचा त्रास होऊ लागला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम forest gaurd death due to swine flu at chalisgaon
'स्वाइन फ्लू'मुळे वनरक्षकाचा मृत्यू


त्रास वाढल्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लुची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील एमआयटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचे रविवारी निधन झाले. नितीन चव्हाण यांच्या पश्चात वडील, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज