अ‍ॅपशहर

लाचप्रकरणी तलाठ्यास चार वर्षांची शिक्षा

सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करून उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या पिंप्राळा येथील तत्कालीन तलाठी सत्यजित नेमाने यांस न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने सेवानिवृत्त कोतवालाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Maharashtra Times 31 Jul 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम four years of fine in bribery case in jalgaon
लाचप्रकरणी तलाठ्यास चार वर्षांची शिक्षा


सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करून उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या पिंप्राळा येथील तत्कालीन तलाठी सत्यजित नेमाने यांस न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांची शिक्षा शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने सेवानिवृत्त कोतवालाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सावखेडा येथील तक्रारदार यांची सावखेडा शिवारातील शेतीच्या उताऱ्यावरील बहिणीचे नाव कमी करण्यासाठी त्यांनी नोंदणीकृत हक्कसोड पत्र तयार केले होते. त्यानुसार अर्ज व त्यासंबंधीचे कागदपत्रे त्यांनी जोडून पिंप्राळा येथील तत्कालीन तलाठी सत्यजित नेमाने यांच्याकडे दिले होते. दरम्यान, सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करून उतारा देण्यासाठी तलाठी नेमाने यांनी दि. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी तक्रारदाराकडून १,५०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करून विभागाने पिंप्राळा तलाठी कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांच्यासह सेवानिवृत्त कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे यांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या खटल्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या खटल्याचे कामकाज न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात होऊन न्यायालयाने साक्षी पुराव्यांवरून तलाठी सत्यजित नेमाने याला दोषी ठरविले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज