अ‍ॅपशहर

सागर पार्कवर गणेशमूर्ती जैसे थे

शहरातील सागर पार्क तसेच शिवतीर्थ मैदानावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. मंगळवारी त्यांनी सागर पार्कवर जाऊन संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत समजावले. यानंतर मूर्तींचे विधिवत विसर्जन करून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना दिले.

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh festival after visarjan issue
सागर पार्कवर गणेशमूर्ती जैसे थे

शहरातील सागर पार्क तसेच शिवतीर्थ मैदानावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. मंगळवारी त्यांनी सागर पार्कवर जाऊन संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत समजावले. यानंतर मूर्तींचे विधिवत विसर्जन करून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना दिले.

महापालिकेतर्फे शिवतीर्थ मैदान तसेच सागर पार्क येथे कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते. तेथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे भाविकांकडून विसर्जन करण्यात आले. मात्र, बारा दिवस उलटूनदेखील गणेश मूर्तींचे विघटन झाले नसून मूर्ती तशाच पडून आहेत. त्यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्या गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

जिल्हापेठ पोलिसात विटंबनेबाबत मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याविरूद्ध तर रामानंद पोलिसांत आर्य चाणक्य संस्थेचे अध्यक्ष अतुलसिंग हाडा व मनपा आयुक्त यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर दोन ते तीन दिवसात कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना आरटीआय कार्यकर्ता दीपक गुप्ता, मोहन तिवारी, महेश सपकाळे, आशिष गांगवे, ईश्वर चौधरी आदी हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज