अ‍ॅपशहर

गंगाजल हवेहवेसे!

भारतीय संस्कृतीत गंगाजलास महत्त्व आहे. धार्मिक विधींसाठी तर गंगाजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु अनेकदा सर्वसामान्यांना गंगाजल मिळत नसल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशभरातील मुख्य टपाल कार्यालयात गंगाजल उपलब्ध करून दिले आहे. या योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद वाढत असल्याची माहिती जळगावचे डाक अधीक्षक व्ही. बी. चव्हाण यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.

Maharashtra Times 21 Oct 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gangajal in post office
गंगाजल हवेहवेसे!

भारतीय संस्कृतीत गंगाजलास महत्त्व आहे. धार्मिक विधींसाठी तर गंगाजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु अनेकदा सर्वसामान्यांना गंगाजल मिळत नसल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशभरातील मुख्य टपाल कार्यालयात गंगाजल उपलब्ध करून दिले आहे. या योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद वाढत असल्याची माहिती जळगावचे डाक अधीक्षक व्ही. बी. चव्हाण यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.

गंगाजल योजनेला ४ जुलैपासून सुरुवात झाली. आतापर्यंत जळगाव पोस्ट ऑफीसमधून १०० हून अधिक बाटल्या गंगाजलाची विक्री झाली आहे. चाळीसगाव शाखेतूनदेखील ८० हून अधिक बाटल्यांची विक्री झाली आहे. ही योजना राज्यातील सर्वच मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये सुरू आहे. सध्या बाटलीतून विक्रीसाठी येत असलेले गंगाजल हे ऋषिकेश व गंगोत्री येथून येत आहे. गंगोत्रीहून येत असलेल्या गंगाजलाला मागणी जास्त असून, २०० मिलीची बाटली २५ रुपये व ५०० मिलीची बाटली ३५ रुपयांमध्ये विक्री होत आहे. ऋषिकेशच्या गंगाजलची बाटली अनुक्रमे १५ व २५ रुपयांमध्ये विक्री होत आहे. ग्राहक ऑनलाइनवरही गंगाजल ऑर्डर करू शकतात. हे गंगाजल त्यांना पोस्टाने घरपोच मिळणार आहे. जिल्ह्यातील मुख्य शाखेसह तालुका शाखांमध्येदेखील गंगाजल लवकरच मिळणार असल्याची माहिती डाक अधीक्षक व्ही. बी. चव्हाण यांनी ‘मटा’ ला दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज