अ‍ॅपशहर

सांघिक भावनेने खेळून प्राविण्य मिळवा

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळून वेगवेगळया खेळांत प्राविण्य प्राप्त करावे व आपल्या विभागाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री महादेव जानकर यांनी आज केले.

Maharashtra Times 30 Oct 2018, 5:00 am
राज्यमंत्री महादेव जानकर यांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम get success by team spirit says state minister mahadeo jankar to sportsman in jalgaon program
सांघिक भावनेने खेळून प्राविण्य मिळवा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळून वेगवेगळया खेळांत प्राविण्य प्राप्त करावे व आपल्या विभागाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री महादेव जानकर यांनी आज केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव येथे सोमवारी (दि. २९) ऑल इंडिया रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आकशात फुगे सोडून व क्रीडाज्योत पेटवून उद्घाटन केले. व्यासपीठावर महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, मध्ये रेल्वे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुलकुमार श्रीवास्तव, मुख्य सुरक्षा आयुक्त अलोक बोहरा, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश घुले, भुसावळ रेल्वे प्रबंधक आर. के. यादव आदी उपस्थित होते.

मंत्री जानकर म्हणाले की, रेल्वे विभागाने सन २०१८ च्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे अतिशय सुंदर आयोजन केले आहे. या स्पर्धेतून प्राविण्य मिळविणारे खेळाडू भारतीय पोलिस ड्युटी मेरिट मध्ये रेल्वे विभागाचे नाव सर्वोच्च स्थानावर नेतील, अशी मला आशा आहे. या स्पर्धेत ३०० ते ३५० पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी खेळात चांगले प्रदर्शन करून भविष्यात होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी राज्यमंत्री जानकर यांच्या हस्ते ८०० मीटर धावणे पुरुष स्पर्धेत सुवर्णपदक सुनील कुमार, रौप्यपदक गर्जेंद्र कुमार व कांस्यपदक जितेंद्र कुमार यांना देण्यात आले. तर ८०० मीटर धावणे महिला स्पर्धेत सुवर्णपदक रेणुका पी., रौप्यपदक फर्जना अन्सारी तर कांस्यपदक अस्पा भारती यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज