अ‍ॅपशहर

‘गिरीश महाजनांचीही चौकशी झालीच पाहिजे’

राज्य सरकारने दाऊद संभाषणाप्रकरणी जशी आमदार एकनाथ खडसेंची चौकशी केली तशीच चौकशी आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी रविवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 29 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girish mahajan investigation issue
‘गिरीश महाजनांचीही चौकशी झालीच पाहिजे’


राज्य सरकारने दाऊद संभाषणाप्रकरणी जशी आमदार एकनाथ खडसेंची चौकशी केली तशीच चौकशी आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी रविवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी, पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही दाऊद संबंधाचा आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, ते कधीही सिद्ध झाले नाही, असे सांगितले. त्यानंतर माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही दाऊद संभाषणाचा आरोप करून ज्यांनी रान पेटविले तेच आता दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात जात आहेत. त्यामुळे खडसेंप्रमाणे त्यांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा दि. १० जून रोजी वर्धापन दिनानिमित्त दि. ४ ते १० जून असा स्वाभिमान सप्ताह राबविला जाईल.


स्वाभिमान असेल तर सेनेने सत्तेतून बाहेर पडावे

शिवसेनेतर्फे साजरा केला जात असलेला भगवा सप्ताह म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केली. एकीकडे सत्तेत रहायचे आणि विरोधात असल्यासारखे वागायचे हे योग्य नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान त्यांनी दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज