अ‍ॅपशहर

‘गोलाणी’ची याचिका फेटाळली

तत्कालीन नगरपालिकेने बीओटी तत्त्वावर बांधलेले गोलाणी मार्केट व १७ मजली इमारतीच्या बांधकामासाठी केलेल्या कराचा भंग करून पालिकेचे आर्थिक नुकसान करीत मक्तेदाराला पेमेंट केल्याच्या ठरावाविरोधात नगरसेवक नरेंद्र पाटील व छबीलदास खडके यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी (दि. १२) हायकोर्टाच्या द्वीपीठाने फेटाळून लावली आहे. महापालिका प्रशासनाने यात नुकसान झाले नसल्याचा खुलासा केल्याने तसेच इतक्या जुन्या विषयात हस्तक्षेप करणे अवघड असल्याच्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

Maharashtra Times 13 Jan 2017, 4:00 am
तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवकांना दिलासा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम golani market and muncipal corporation building tax issue
‘गोलाणी’ची याचिका फेटाळली

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

तत्कालीन नगरपालिकेने बीओटी तत्त्वावर बांधलेले गोलाणी मार्केट व १७ मजली इमारतीच्या बांधकामासाठी केलेल्या कराचा भंग करून पालिकेचे आर्थिक नुकसान करीत मक्तेदाराला पेमेंट केल्याच्या ठरावाविरोधात नगरसेवक नरेंद्र पाटील व छबीलदास खडके यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी (दि. १२) हायकोर्टाच्या द्वीपीठाने फेटाळून लावली आहे. महापालिका प्रशासनाने यात नुकसान झाले नसल्याचा खुलासा केल्याने तसेच इतक्या जुन्या विषयात हस्तक्षेप करणे अवघड असल्याच्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

महापालिकेने बीओटी तत्त्वावर गोलाणी मार्केट व सतरा मजली बांधण्यासाठी मक्तेदाराशी करार केला होता. सन १९८८ ते २००१ या काळात कराराचा भंग करून पालिकेचे आर्थिक नुकसान करित मक्तेदाराला पेमेंट केल्याच्या ठरावाविरोधात नगरसेवक व छबीलदास खडके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरु होती. आज गुरुवारी, न्या. व्ही. एन. कानडे व एस. एस. पाटील यांच्या द्विपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

सुनावणीदरम्यान, महापालिकेने बाजू मांडताना या मार्केटची किंमत आता वाढली आहे. तसेच गाळ्यांच्या माध्यमातून पालिकेला भाडे मिळत आहे, असे सांगितले. तसेच हा विषय २० वर्षे जुना आहे. त्यात आता हस्तक्षेप करणे अवघड आहे. तसेच आता ते ठराव रद्द केले तरी उपयोग होणार नाही या व इतर मुद्द्यांच्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली. महापालिकेतर्फे अॅड. पी. आर. पाटील, तक्रारदार यांच्यातर्फे अॅड. विनायकदास दीक्षित तर सुरेश जैन यांच्यातर्फे अॅड. पी. एम. शाह यांनी काम पाहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज