अ‍ॅपशहर

पाडवा मिरवणुकीसाठी शहरात जय्यत तयारी

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांतर्फे गुढीपाडवा निमित्त मंगळवारी (दि. २८) रोजी शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Times 24 Mar 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gudhipadwa shobhayatra program at jalgaon
पाडवा मिरवणुकीसाठी शहरात जय्यत तयारी


जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांतर्फे गुढीपाडवा निमित्त मंगळवारी (दि. २८) रोजी शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील विविध पंथ, संप्रदाय, उपासना केंद्र, गणेश मंडळ, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने सालाबादाप्रमाणे यावर्षीही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी ह. भ. प. मंगेश महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला दीपक जोशी, छोटू नेवे, गिरीश कुळकर्णी, ऋषाली देशपांडे, योगेश कासार, भैय्या गाडगे, अशोक माळी, संजय कोरके, मनोज चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकुंद धर्माधिकारी यांनी केले.

ही स्वागत यात्रा गायत्री मंदिरापासून काढण्यात येणार असून दक्षिणमुखी मारुती मंदिर, इच्छापूर्ती गणपती मंदिर, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, सुभाष चौक, सराफ बाजार मार्गे रथचौकात यात्रेची सांगता करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता महाआरती झाल्यानंतर गावगुढी पूजन करण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी शनिवारी (दि. २५) सायंकाळी ७.३० वाजता आरती अपार्टमेंट, गणानाम भवन एम. जे. कॉलेज मागे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज