अ‍ॅपशहर

आज ‘महामार्ग रोको’

शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६चा विस्तार आणि समांतर रस्ते विकास करावा या मागणीसाठी आज (दि. १०) समांतर रस्ते कृती समितीने ‘महामार्ग रोको’ आंदोलनाची हाक दिली आहे.

Maharashtra Times 10 Jan 2018, 4:00 am
समांतर रस्ता कृती समितीची आखणी पूर्ण; पोलिसांकडून यंत्रणा सज्ज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम highway stop campaign today in jalgaon city for service road issue
आज ‘महामार्ग रोको’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६चा विस्तार आणि समांतर रस्ते विकास करावा या मागणीसाठी आज (दि. १०) समांतर रस्ते कृती समितीने ‘महामार्ग रोको’ आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन सकाळी १० वाजता शहरातील अजिंठा चौफुली येथे केले जाणार असून, जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लेखी हमी देत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असेही कृती समितीने सांगितले.

आंदोलनाच्या काळात व्यापारी पेठ दुपारी एक वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामध्ये जवळपास ४० च्यावर सामाजिक संघटनांचा सहभाग असेल. हे आंदोलन शांतता व सुव्यवस्थेत कसे केले जाईल याची सविस्तर तयारी पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, शहर वाहतूक निरीक्षक विलास सोनवणे आणि कृती समितीच्या सदस्यांनी केली. दरम्यान, समांतर रस्ते कृती समितीने पुकारलेल्या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी होऊन दुपारी एक वाजेपर्यंत व्यापारी पेठ बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने जाहीर केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज