अ‍ॅपशहर

एकदिवस अगोदरपासूनच पालिकेत ‘हॉलिडे फिवर’

शासकीय कर्मचाऱ्यांना आजपासून जोडून चार दिवसांच्या सुट्यांची मेजवानी मिळाली आहे. तरीही महापालिकेतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी सुटी घेऊन किंवा दुपारीच कार्यालय सोडल्याने एकदिवस अगोदरच त्यांचा ‘हॉलिडे फिवर’ सुरू केला. यामुळे दुपारनंतर कामासाठी येणाऱ्या ना‌गरिकांची मात्र रिकाम्या हाती परतावे लागले.

Maharashtra Times 23 Nov 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon holiday1

शासकीय कर्मचाऱ्यांना आजपासून जोडून चार दिवसांच्या सुट्यांची मेजवानी मिळाली आहे. तरीही महापालिकेतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी सुटी घेऊन किंवा दुपारीच कार्यालय सोडल्याने एकदिवस अगोदरच त्यांचा ‘हॉलिडे फिवर’ सुरू केला. यामुळे दुपारनंतर कामासाठी येणाऱ्या ना‌गरिकांची मात्र रिकाम्या हाती परतावे लागले.

महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना आज (दि. २३) गुरुनानक जयंती, शनिवार (दि. २४) व रविवार अशा तीन दिवसांच्या सुट्या सुरू होण्याच्या एक दिवसअगोदरच हॉलिडे फिवरमध्ये गेलेले आहेत. वाढता आस्थापना खर्च, घटत चालले उत्पन्न आणि कर्जफेडीच्या हप्त्यांमुळे महापालिका प्रशासनाची गाडी अद्याप रुळावर आली नसतानाच अधिकाऱ्यांच्या सुटी साधण्याच्या या वृत्तीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आयुक्त व उपायुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांसह बहुसंख्य कर्मचारी कार्यालयात नसल्याने अनेक विभागात शुकशुकाट होता.

नगररचना विभागात शुकशुकाट
महापालिकेच्या नगररचान विभागात सहाय्यक नगररचनाकार अनंत धामणे यांच्यासह एकही रचना सहाय्यक कार्यालयात उपस्थित नव्हते. केवळ लिपीक हिरवणे हे एकटेच कार्यालयात थांबून होते. महापालिकेत अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांनीही कामे नसल्याने ऑनड्युटी सुटीचा आनंद घेतला. मूलभूत सुविधा, अतिक्रमण, पाण्याची समस्या, नगररचना विभाग, घरपट्टी संदर्भातील कामांसाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांची कामे झाली नाहीत. ‘साहेब नाहीत, आता सोमवारी या’ अशी उत्तरे घेऊन त्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज