अ‍ॅपशहर

क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सन्मान

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मंगळवारी (दि. २९) जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या तसेच जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या १५६ खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Maharashtra Times 1 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम honor of the players on sports day at jalgaon
क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सन्मान


मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मंगळवारी (दि. २९) जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या तसेच जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या १५६ खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जळगावातील जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रमुख पाहूणे म्हणून व्यासपीठावर छत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, अशोक चौधरी, एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी, क्रीडा भारतीचे डॉ. प्रदीप तळवेलकर, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे समन्वयक फारुख शेख, जिल्हा माहिती अधिकारी बोडखे, अॅथलेटिक्स संघटनेचे राजेश जाधव, प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.

‘निरोगी राहा’

प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले. तसेच नियमित व्यायाम करा व निरोगी राहा असे संदेश दिला. सत्कारात राष्ट्रीय स्तरावरील १२१ तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या ३५ खेळाडूंचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांसह अनिल चांदुरकर, गुरुदत्त चव्हाण, अरविंद खांडेकर, एम. के. पाटील, प्रशांत जगताप, निशा गायकवाड, इकबाल मिर्झा, विवेक अळवणी, विनोद माने, विनोद कुलकर्णी, गोविंद सोनार यांच्यासह क्रीडा शिक्षकांचे सहकार्य मिळाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज