अ‍ॅपशहर

जळगाव: घराचे छत कोसळून चौघांचा मृत्यू

जळगावातील पारोळा शहरातील काझी वाडा भागातील एका घराचे छत कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुदैवी घटना घडली. या कुटुंबातील एक तरुण बचावला.

Maharashtra Times 6 Oct 2017, 2:28 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम house slab collapse in jalgaon
जळगाव: घराचे छत कोसळून चौघांचा मृत्यू


जळगावातील पारोळा शहरातील काझी वाडा भागातील एका घराचे छत कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या कुटुंबातील एक तरुण बचावला.

दुर्घटनेत मरण पावलेल्या कुटुंबाचे प्रमुख भिकन काझी हे सध्या अंकलेश्वर येथे आहेत. भिकन काझी चादरी विकण्याचा व्यवसाय करतात. त्याच कामासाठी ते अंकलेश्वर येथे गेल्याचे समजते. काझी कुटुंबातील दोघांचे प्राण वाचले आहेत. या दुर्घटनेत सायराबी भिकन काझी (वय ५०), मोइनोउद्दीन भिकन काझी (वय २५) , हाशीम भिकन काझी (वय २७), शाबीनबी भिकन काझी (वय १८) हे मृत्यूमुखी पडले तर वसीम काझी हा २८ वर्षीय युवक या दुर्घटनेतून बचावला. गरीब व होतकरू कुटुंबातील सदस्यांवर काळाने असा घाला घातल्याने पारोळा शहरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस अधिक तपास करत असून तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज