अ‍ॅपशहर

कर्जफेडीसाठी दोन प्रस्ताव

जळगाव महापालिकेवर असलेल्या हुडकोच्या कर्जफेडीसाठी महापालिका प्रशासनाने मूळ कर्जाच्या अडीचपट रक्कम भरल्याने यातून आता मुक्त करावे यासह दोन प्रस्ताव हुडकोकडे पाठविले आहेत. या दोन प्रस्तावांवर आज (दि. ७) दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून पाठपुरावा सुरू असल्याने हा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Times 7 Dec 2018, 5:00 am
‘हुडको’बाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hudco loan return issue meeting at new delhi today
कर्जफेडीसाठी दोन प्रस्ताव


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव महापालिकेवर असलेल्या हुडकोच्या कर्जफेडीसाठी महापालिका प्रशासनाने मूळ कर्जाच्या अडीचपट रक्कम भरल्याने यातून आता मुक्त करावे यासह दोन प्रस्ताव हुडकोकडे पाठविले आहेत. या दोन प्रस्तावांवर आज (दि. ७) दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून पाठपुरावा सुरू असल्याने हा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तत्कालीन नगरपालिकेने घरकुलसह विविध २१ योजनांसाठी हुडकोकडून १४१ कोटी ३४ लाखाचे कर्ज घेतले. कर्जाच्या रक्कमेपेक्षा अडीचपट रक्कम ३५० कोटी व्याजासह आतापर्यंत अदा केली आहे. हुडकोच्या कर्जाची एकरकमी परतफेड करावी, असा आग्रह मनपा प्रशासन होत आहे. मात्र, हुडको जळगाव महापालिकेला बजावलेल्यो ३४१ कोटीच्या डीआरटी डिक्री नोटीसवर ठाम आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे.

आमदार सुरेश भोळे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने अखेर हुडको कर्जफेडीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (दि. ७) दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीस राज्याचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे उपस्थित राहणार आहेत. सध्या महापालिका उ्च्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हुडको कर्जफेडीसाठी दरमहा ३ कोटी रुपयांचा हप्त भरत आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे एकरकमी कर्जफेड करून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून सुरू आहे.

अडीचपट रक्कम भरल्याने कर्जमुक्ती द्या
आज होणाऱ्या बैठकीत हुडको कर्जफेडीबाबत महापालिका प्रशासनाने दोन प्रस्ताव तयार केले असून, ते मुख्यमंत्री यांना पाठवले आहेत.

पहिला प्रस्ताव...
महापालिकेने कर्जाच्या रकमेपेक्षा अडीचपट रक्कम ३५० कोटी व्याजासह आतापर्यंत अदा केली आहे. तसेच हप्ता भरण्यात येणारा पैसा हा जळगावातील नागरिकांनी भरलेल्या करातील असल्याने आता महापालिकेला कर्जातून मुक्त करावे, अशी भूमिका आहे.
दुसरा प्रस्ताव...
महापालिकेला हुडकोने सन २००४ मध्ये कर्जाची रिसेटेलमेंट करून दिली होती. त्या निकषानुसार व्याज आकारून एकरकमी परतफेडीची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानुसार महापालिकेकडे ३५ कोटी ८ लाख रुपये शिल्लक असल्याने त्याची एकरकमी परतफेड करावी, असे म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज