अ‍ॅपशहर

सव्वा लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने रविवारी (दि. २१) शहरातील घाटरोड परिसरात मध्य प्रदेशनिर्मित अवैध दारूचा साठा पकडला. याप्रकरणी मोहन जगन्नाथ चौधरी (वय ४०, रा. मारूती मंदीराच्या मागे, चौधरीवाडा, चाळीसगाव) याला जागेवरच अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी जप्त आलेल्या दारूची किंमत १ लाख १४ हजार इतकी आहे.

Maharashtra Times 23 Apr 2019, 5:00 am
चाळीसगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने रविवारी (दि. २१) शहरातील घाटरोड परिसरात मध्य प्रदेशनिर्मित अवैध दारूचा साठा पकडला. याप्रकरणी मोहन जगन्नाथ चौधरी (वय ४०, रा. मारूती मंदीराच्या मागे, चौधरीवाडा, चाळीसगाव) याला जागेवरच अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी जप्त आलेल्या दारूची किंमत १ लाख १४ हजार इतकी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal liquor seized of 1 2 lakhs at chalisgaon
सव्वा लाखांचा अवैध दारूसाठा जप्त


लोकसभा निवडणुकीनिमित्त ड्राय डे असल्याने शहरातील एका ठिकाणी परराज्यातील विदेशी मद्यविक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथक, नाशिक यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक सुरेश रावते, वसंत माळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हिरामण ब्राह्मणे, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, प्रकाश तायडे, गोकुळ कखंरे यांच्या भरारी पथकाने शहरातील घाटरोड वरील सुभाष प्लाझा येथील चेतन बिअर आणि वाईन शॉपी या दुकानात छापा मारला. तेथे त्यांना मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेल्या तीन कंपन्यांच्या व्हिस्की असा विदेशी मद्यसाठा मिळून आला. त्यावेळी दुकानात हजर असलेला मोहन जगन्नाथ चौधरी यांच्याकडे भरारी पथकाने कसून चौकशी केली असता त्याने अजून मद्यसाठा इतरत्र लवपून ठेवला असल्याची कबुली दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज