अ‍ॅपशहर

ग्राहक खरेदीबाबत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

केसीई सोसायटी संचलित आयएमआर महाविद्यालयात ‘उद्योजकता विकास सेल’ उपक्रमांतर्गत बीबीए इंटिग्रेटेडच्या ७० विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीपासून ते दिवाळी पर्यंतच्या काळात होणारी उलाढाल व लोकांच्या आवडी निवडीबाबत शहरातील १२३० घरांमध्ये सर्वेक्षण केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 25 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imr college students do survey on consumer purchasing at jalgaon
ग्राहक खरेदीबाबत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

केसीई सोसायटी संचलित आयएमआर महाविद्यालयात ‘उद्योजकता विकास सेल’ उपक्रमांतर्गत बीबीए इंटिग्रेटेडच्या ७० विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीपासून ते दिवाळी पर्यंतच्या काळात होणारी उलाढाल व लोकांच्या आवडी निवडीबाबत शहरातील १२३० घरांमध्ये सर्वेक्षण केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

आयएमआर महाविद्यालयातील बीबीएच्या विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात पाच दिवस शहरातील १२३० घरांमध्ये प्रश्‍नावलीच्या माध्यामातून सर्वेक्षण करत माहिती संकलित केली. या सर्वेक्षणात होम किचन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू यांमध्ये बाजारपेठेत होणारी उलाढाल याबाबत माहिती जमा केली. या सर्वेक्षणाचे प्रा. विशाल संदानशीवे व प्रा. नितीन खर्चे यांनी सांख्यिक विवरण तयार केले. या प्रोजेक्टसाठी प्रा. स्वप्नील काटे, प्रा. खुशबू बांगर, प्रा. दीपाली पाटील, जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर वाणी, विजय पाटील यांचे सहकार्य लाभले. होम किचन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादन खरेदी यामध्ये सर्वात जास्त २९.१७ टक्के मोबाइल खरेदीला पसंती देण्यात आली आहे. यासह विविध उत्पादनांच्या आवडीनुसार माहितीचादेखील यात समावेश आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज