अ‍ॅपशहर

२१ तासांत बाप्पाचे म्युरल साकार

येथील केसीई संस्थेत सुरू असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा ‘श्रीगणपती म्युरल’ निर्मिती कार्यक्रम बुधवारी (दि. १२) सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी अवघ्या २० तास ५५ मिनिटात पूर्ण झाला. त्याचबरोबर या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या दोन्ही संस्थांमध्ये नोंददेखील झाली. यामुळे केसीई संस्थेचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

Maharashtra Times 13 Sep 2018, 2:58 am
२० तास ५५ मिनिटांत पूर्ण करीत एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IMG-20180912-WA0147 (1)

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

येथील केसीई संस्थेत सुरू असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा ‘श्रीगणपती म्युरल’ निर्मिती कार्यक्रम बुधवारी (दि. १२) सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी अवघ्या २० तास ५५ मिनिटात पूर्ण झाला. त्याचबरोबर या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या दोन्ही संस्थांमध्ये नोंददेखील झाली. यामुळे केसीई संस्थेचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.

‘आनंदयात्री’ डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रीत्यर्थ व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त आयोजित ‘श्रीगणपती म्युरल’ निर्मिती कार्यक्रम मंगळवार दि. ११ ते १२ सप्टेंबर दरम्यान एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. दि. ११ रोजी दुपारी १२.३० वाजेपासून निर्मितीला प्रारंभ होऊन दि. १२ रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी समाप्त झाला. एकूण २० तास ५५ मिनिटांत ही निर्मिती पूर्ण झाली. याकरिता ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे, शिक्षक पुरुषोत्तम घाटोळ, प्राजक्ता तायडे यांच्यासह ५० विद्यार्थ्यांनी म्युरल पूर्ण केले. म्युरल निर्मिती पूर्ण केल्याबद्दल सकाळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी म्युरल निर्मिती टीमचे अभिनंदन केले. केसीई सोसायटीच्या शिरपेचात या विक्रमामुळे मानाचा तुरा रोवला गेला असे ते म्हणाले. यावेळी टीमने ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. दुपारी ४ वाजता ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ. ममता काबरा यांनी विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे पदक व प्रमाणपत्र संस्थेस प्रदान केले. या वेळी संस्थेतर्फे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी पदक व प्रमाणपत्र स्वीकारले. या वेळी मुख्य व्यवस्थापन समितीचे सचिव संजीव पाटील यांच्यासह डॉ. जगदीप बोरसे, अ‍ॅड. राहुल राणे, सुभाष तळेले, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज