अ‍ॅपशहर

जळगाव बाजार समितीमध्ये आवक दुप्पटीने वाढली

कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मालाची आवक घटली होती. मात्र, आज बुधवारी पुन्हा आवक वाढल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Maharashtra Times 8 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम increases agri products in jalgaon market commitee
जळगाव बाजार समितीमध्ये आवक दुप्पटीने वाढली


कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मालाची आवक घटली होती. मात्र, आज बुधवारी पुन्हा आवक वाढल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. २० टक्क्यांवर आलेली मालाची आवक बुधवारी (दि. ७) पुन्हा ८० ते ९० टक्के इतकी झाली आहे. आवक वाढल्याने भाज्यांचे दर पहिल्यापेक्षा कमी झाले आहेत.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, वीजबिले माफ करावी, खतांवरील अनुदान वाढवावे, शेतमालाच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करावी, शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च माफ व्हावा आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून (दि. १ जून) शेतकरी संपावर गेले आहेत. त्यात जिल्ह्यातील ४ लाख शेतकरी सहभागी झाले होते. त्यामुळे बाजार समितीमध्ये ७५ टक्के मालाची आवक घटली होती. केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनी भाजीपाला आणला होता. त्यामुळे बाजारपेठेत भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता.

यामुळे भाज्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या होत्या. त्यानंतरही मंगळवारपर्यंत बाजार समितीमधील आवक कमीच होती. मंगळवारी जळगाव बाजार समितीमध्ये ४५० क्विंटल भाजीपाला आला होता. हे प्रमाण वाढून बुधवारी बाजार समितीमध्ये ८८६ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. एकंदरीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांचा तुटवडा कमी झाला. त्यामुळे मिरचीसह भाज्यांचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, अद्यापही भाजीचे दर हे किलोमागे २० ते ३० रुपये असल्याने ते नेहमीपेक्षा जास्तच आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यांना आपल्या घराचे बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज