अ‍ॅपशहर

अपात्र लोक पात्र लोकांच्या जागेवर बसलेत: खडसे

अपात्र लोक वर जावून बसले आहेत आणि ज्यांची पात्रता आहे ते लोक बाहेर आहेत, अशा शब्दांत माजी महसुलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली. भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने आयोजित पाडळसे येथील लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2018, 5:22 pm
जळगाव: अपात्र लोक वर जावून बसले आहेत आणि ज्यांची पात्रता आहे ते लोक बाहेर आहेत, अशा शब्दांत माजी महसुलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली. भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने आयोजित पाडळसे येथील लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम khadse


आपल्या भाषणात एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे या देशात जन्माला आहे, हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले. त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथर्पयत पोहचले. मात्र आज परिस्थिती उलट आहे. ज्यांची पात्रता आहे ते आज बाहेर आहेत आणि ज्यांची पात्रता नाही ते तेथे बसलेत.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव द्या

कवयित्री बहिणाबाई चौधरी खान्देशकन्या होत्या. हे लक्षात घेऊ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात यावा अशी मागणी खडसे यांनी यावेळी केली.

या वेळी व्यासपीठावर कुटुंब नायक रमेश विठू पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार रमेश चौधरी, महाअधिवेशन समितीचे अध्यक्ष विष्णू भगाळे, शिरीष चौधरी, शामल सरोदे, मंदा खडसे आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज