अ‍ॅपशहर

मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू

सात दिवसांपासून दुचाकी घेऊन गेल्याच्या क्षुल्लक गोष्टीच्या रागातून चौघांनी तरुणास मंगळवारी मध्यरात्री धुळे तालुक्यात जाऊन मारहाण ककेली. यामध्ये तरुणाला बुधवारी पहाटे २.४५ वाजता जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून ते पसार झाले. या तरुणाचा उपचार घेताना बुधवारी (दि. २) सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. प्रमोद विलास पाटील (वय २२, रा. पळासदरे, ता.अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम injured youth dies in jalgaon hospital
मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू

सात दिवसांपासून दुचाकी घेऊन गेल्याच्या क्षुल्लक गोष्टीच्या रागातून चौघांनी तरुणास मंगळवारी मध्यरात्री धुळे तालुक्यात जाऊन मारहाण ककेली. यामध्ये तरुणाला बुधवारी पहाटे २.४५ वाजता जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून ते पसार झाले. या तरुणाचा उपचार घेताना बुधवारी (दि. २) सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. प्रमोद विलास पाटील (वय २२, रा. पळासदरे, ता.अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अरुण उर्फ टीन्या भिमराव गोसावी (वय ४३, दोघे रा. तुकारामवाडी) याचा बी. जे. मार्केट परिसरात पत्त्यांचा क्लब आहे. या क्लबवर पंकज नारायण सपकाळे (वय २७, रा.गेंदालाल मिल), सुरज उर्फ सुऱ्या विजय ओतारी (वय २६), व गणेश उर्फ मेंबर सोमा नन्नवरे (वय ४०, रा.पाळधी, ता. धरणगाव) हे काम करतात.
काही महिन्यांपासून प्रमोद हादेखील क्लबवर येत होता. दरम्यान, सात दिवसांपूर्वी प्रमोद हा अरुण गोसावीची दुचाकी (एमएच १९ सीएम २२२१) घेऊन गावाकडे गेला होता. दोन-तीन दिवस झाल्यानंतर तो परत न आल्यामुळे गोसावीसह सर्व जण चिडून प्रमोदला मोरताळा (ता. धुळे) येथील एका ढाब्यावर गाठले. त्याच्यावर चौघांनी हल्ला चढवित लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. यानंतर चारचाकीतून सोबत जळगावला आणून शहरात पुन्हा एकदा मारहाण करून पहाटे २.४५ वाजता जखमी अवस्थेत प्रमोदला शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, बुधवारी सकाळी ८ वाजता प्रमोदचा रुग्णालयातच मृत्यू झाला. या प्रकरणी पंकज व सूरज या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज