अ‍ॅपशहर

शासकीय अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय परिषद

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालय असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, २० जानेवारीपासून दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा ‘टेक्नो व्हीजन २०१७’चे आयोजन करण्यात आहे.

Maharashtra Times 19 Jan 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम international conference at government enginnering college jalgaon for friday
शासकीय अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय परिषद

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालय असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवार, २० जानेवारीपासून दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा ‘टेक्नो व्हीजन २०१७’चे आयोजन करण्यात आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण ४६ हजारांची रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सादरीकरणासाठी निवडलेल्या सर्व स्पर्धकांच्या भोजन आदी नेहमीच्या सुविधेबरोबर बाहेरील सर्व विद्यार्थ्यांची विनामूल्य निवास व्यवस्था व रेल्वे प्रवासाचा खर्चही देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्‍घाटनासाठी डॉ. क्रक्युअर (यूएसए), डॉ. तरेंद्र ताखनकर, डॉ. सुदर्शन कुरवाडकर, डॉ. एस. एस. डंभारे, डॉ. ए. बी. अंधारे, डॉ. यू. एस. भदादे, डॉ. अविनाश कदम, डॉ. पी. पी. नगराळे, डॉ. रामटेके उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर, प्रा. डॉ. आर. डी. कोकाटे, प्रा. जी. के. अनंदुरकर, प्रा. डॉ. उसतकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज