अ‍ॅपशहर

पोषण आहार खर्चात अनियमितता

जिल्हा परिषदेपाठोपाठ महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शालेय पोषण आहाराच्या खर्चात अनियमितता झाल्याचे समोर येत आहे. सन २०१३-१४ या वर्षाच्या लेखापरिक्षणातून हा प्रकार समोर आला आहे.

Maharashtra Times 22 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम irregularity on nutrition dieting costs
पोषण आहार खर्चात अनियमितता


जिल्हा परिषदेपाठोपाठ महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शालेय पोषण आहाराच्या खर्चात अनियमितता झाल्याचे समोर येत आहे. सन २०१३-१४ या वर्षाच्या लेखापरिक्षणातून हा प्रकार समोर आला आहे. लेखा परिक्षकांनी पत्र पाठवून अहवाल सादर करावा असे पत्र महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला दिले आहे.

मनपा शिक्षण मंडळाच्या सन २०१३-१४ या वितीय वर्षाचे लेखापरिक्षण करण्यात आले. हे लेखापरिक्षण औरंगाबादच्या स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाने केले. कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे लाभ अधिक देण्यात आले असल्याचे त्यात निदर्शनास आले आहे. शिक्षण मंडळातील शालेय पोषण आहार योजनेच्या रोख वहीचे लेखापरिक्षण करण्यात आले. मात्र यात तफावत आढळून आली आहे. बँकेत असलेली शिल्लक रक्कम आणि रोख वहीतील शिल्लक रक्कम यात देखील तफावत आहे. तर काही शाळांमधील शालेय पोषण आहाराच्या खर्चाची नोंद बँक पासबुकमध्ये आढळून येत नाही. रोख वहीतील व्यवहाराच्या दिवशीच सर्व जमा व खर्चाच्या नोंदी रोख वहीत घेवून दैनंदिन शिल्लक रक्कम अंकी व अक्षरी लिहणे आवश्यक असतांनाही तसे दिसून आले नसल्याचा आक्षेप लेखापरिक्षकांनी नोंदविला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज