अ‍ॅपशहर

विवाहितेच्या मृत्यूनंतर सिव्हिलबाहेर गोंधळ

तालुक्यातील मन्यारखेडा येथील शितल उर्फ पूजा मनोज पाटील (वय ३०) या विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांच्या नावावर मालमत्ता करण्यासाठीच्या वादातून मंगळवारी (दि. २१) दुपारी जिल्हा रुग्णालयात सासर व माहेरचे दोन्ही गट समोरासमोर आले.

Maharashtra Times 22 Nov 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम issue at jalgaon civil hospital outside
विवाहितेच्या मृत्यूनंतर सिव्हिलबाहेर गोंधळ


तालुक्यातील मन्यारखेडा येथील शितल उर्फ पूजा मनोज पाटील (वय ३०) या विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांच्या नावावर मालमत्ता करण्यासाठीच्या वादातून मंगळवारी (दि. २१) दुपारी जिल्हा रुग्णालयात सासर व माहेरचे दोन्ही गट समोरासमोर आले. या दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाल्याने यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शितल उर्फ पूजा मनोज पाटील या विवाहितेचा सोमवारी (दि. २०) दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. सासरच्यांनी घातपात केल्यामुळेच शितलचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला होता. त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालयात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशीही हा तणाव कायम होता. माहेरचे लोक मालमत्ता नावावर करण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने शवविच्छेदनास विलंब होऊन मृतदेहाची अवहेलना होत होती. त्यामुळे माहेरच्या लोकांचा संताप होऊन ते सासरच्या लोकांच्या अंगावर धावून गेले.

पोलिसांची मध्यस्थी

जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाल्याचे कळताच पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी ग्रुप कॉल करून शहरातील सर्व बीट मार्शल व अतिरिक्त बंदोबस्त पाच मिनिटात रुग्णालयात बोलावले. कायदा हातात घेतला तर सर्व लोकांवर नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा सांगळेंनी दिल्यानंतर नातेवाईक शवविच्छेदनास तयार झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज