अ‍ॅपशहर

जगन्नाथ यात्रेने वेधले लक्ष

‘हरे कृष्णा हरे कृष्णा’ व ‘जय जगन्नाथ स्वामी’ यांच्या जयघोषात जळगावातून निघालेल्या जय जगन्नाथ भगवान रथयात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी (दि. १७) इस्कॉन या संस्थेतर्फे भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांची रथ यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रथयात्रेस शिवतिर्थ मैदानावरून सुरुवात करण्यात आली.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:20 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jagannath yatra festival at jalgaon
जगन्नाथ यात्रेने वेधले लक्ष

‘हरे कृष्णा हरे कृष्णा’ व ‘जय जगन्नाथ स्वामी’ यांच्या जयघोषात जळगावातून निघालेल्या जय जगन्नाथ भगवान रथयात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी (दि. १७) इस्कॉन या संस्थेतर्फे भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांची रथ यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रथयात्रेस शिवतिर्थ मैदानावरून सुरुवात करण्यात आली.

यावेळी रथयात्रेचे पूजन व आरती लोकनाथ स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महापौर नितीन लढ्ढा, सुनील मंत्री तसेच परमात्मा दास आदी उपस्थित होते. भाविकांनी रथ ओढण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी यात्रेची सुरुवात वाजत गाजत भजन सादर करून वाद्यांच्या तालावर करण्यात आली. ही यात्रा जी. एस. मैदान, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य चौक, भास्कर मार्केट, बहिणाबाई उद्यान, रिंग रोड, ख्वॉजामियाँ चौक, कोर्ट चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौकामार्गे पुन्हा जी. एस. मैदानावर सांगता करण्यात आली.

त्यानंतर लोकनाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. त्याचप्रमाणे सायंकाळी नृत्य, नाटिकांचेही सादरीकरण करण्यात आले. या वेळी सुनील मंत्री यांच्यातर्फे २५१ किलोचा भोग अर्पण करण्यात आला. यासह मंडप भोजनाची व्यवस्था शंतनू पाटील, नरेश खंडेलवाल यांच्यातर्फे करण्यात आली. यासाठी अध्यक्ष परमात्मा प्रभू, रेवती रमण दास, मायापूर चंद्रोदय दास, प्रद्युम्न दास आदींचे

सहकार्य मिळाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज