अ‍ॅपशहर

गुरव, दुधाळ, सोनवणेंना ​ साहित्य पुरस्कार जाहीर

येथील ‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन’ आणि ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या बहिणाबाई पुरस्कार, बालकवी ठोमरे पुरस्कार आणि ना. धों. महानोर पुरस्कारांसाठी प्रथितयश साहित्यिक, कवींची निवड शनिवारी (दि. १९) जाहीर करण्यात आली.

Maharashtra Times 20 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jain faoundation sahitya award winners declared
गुरव, दुधाळ, सोनवणेंना ​ साहित्य पुरस्कार जाहीर


येथील ‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन’ आणि ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या बहिणाबाई पुरस्कार, बालकवी ठोमरे पुरस्कार आणि ना. धों. महानोर पुरस्कारांसाठी प्रथितयश साहित्यिक, कवींची निवड शनिवारी (दि. १९) जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्रातील वाङ्मयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्य प्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आठ सदस्यीय समितीने जैन हिल्सला झालेल्या बैठकीत ही निवड केली. बैठकीस विशेष आमंत्रित म्हणून जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ना. धों. महानोर, निवड समिती सदस्य राजन गवस, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, संजय जोशी, शंभू पाटील उपस्थित होते.

असे आहेत पुरस्कार

यंदाच्या द्विवार्षिक पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी कल्पना दुधाळ (दौंड), सर्वोत्कृष्ट कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी किरण गुरव (कोल्हापूर), तर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी वाहरू सोनवणे (नंदुरबार) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. सन्मानचिन्ह, गौरवपत्र, एक्कावन हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ६ सप्टेंबरला जळगाव येथील जैन हिल्सस्थित, गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात होणार असल्याचेही यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज