अ‍ॅपशहर

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

शहरातील शंकरराव नगरातील युवकाने एकतर्फी प्रेमातून त्या तरुणीचा फोटो समोर ठेवून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही सोमवारी (दि. २४) दुपारी १ वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. डिप्लोमाचे शिक्षण घेतलेला हा तरुण गेल्या काही दिवसांपासून चायनीजची गाडी चालवित होता. अक्षय मधुकर वायकोळे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Maharashtra Times 24 Apr 2017, 11:13 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या


शहरातील शंकरराव नगरातील युवकाने एकतर्फी प्रेमातून त्या तरुणीचा फोटो समोर ठेवून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही सोमवारी (दि. २४) दुपारी १ वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. डिप्लोमाचे शिक्षण घेतलेला हा तरुण गेल्या काही दिवसांपासून चायनीजची गाडी चालवित होता. अक्षय मधुकर वायकोळे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

वायकोळे कुटुंब पूर्वी अयोध्या नगरात राहत होते. त्यावेळी गल्लीतील एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. मात्र नंतर वायकोळे कुटुंबाने घर बदलून शंकरराव नगरात घेतले होते. सोमवारी, सकाळी मधुकर वायकोळे हे कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. तर घरी अक्षय, लहान भाऊ पुर्वेश आणि आई सुरेखा हे होते. दुपारी १२.३० वाजता जेवण झाल्यानंतर १ वाजेच्या सुमारास अक्षय बेडरुममध्ये जातो, असे सांगून गेला. त्यानंतर काही दुपारी २.३० वाजेच्या सुमारास भाऊ पुर्वेश त्याला बघण्यासाठी गेला. त्यावेळी अक्षयने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. त्याने आरडाओरड केल्यानंतर त्याची आई त्याठिकाणी आली. शेजारच्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र आपतकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. आत्महत्या करण्यापूर्वी ज्या मुलीवर अक्षयचे एकतर्फी प्रेम होते तिचाच फोटो त्याने समोर ठेवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो फोटोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सध्या शंकरराव नगरात राहणाऱ्या अक्षयने धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथील तंत्रनिकेतन विद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेतले होते. वडील मधुकर वायकोळे हे इस्टेट ब्रोकर आहेत. तर लहान भाऊ पुर्वेश हा डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. अक्षयच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज