अ‍ॅपशहर

कार्डची माहिती विचारून चोरट्याकडून फसवणूक

तुमच्या क्रेडिट कार्डचे पॉईंट जमा झाले असून, ते पैशात रुपांतर करण्याची बतावणी करीत क्रेडिट कार्डचा नंबर विचारून घेतला. त्यानंतर नेहरू नगरातल्या शिक्षकाला चोरट्यांनी ऑनलाईन शॉपिंग करून सात हजार रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (दि. २४) उघडकीस आला.

Maharashtra Times 25 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
कार्डची माहिती विचारून चोरट्याकडून फसवणूक


तुमच्या क्रेडिट कार्डचे पॉईंट जमा झाले असून, ते पैशात रुपांतर करण्याची बतावणी करीत क्रेडिट कार्डचा नंबर विचारून घेतला. त्यानंतर नेहरू नगरातल्या शिक्षकाला चोरट्यांनी ऑनलाईन शॉपिंग करून सात हजार रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (दि. २४) उघडकीस आला.

नेहरू नगरातील सागर पुष्प अपार्टमेन्टमध्ये दीपक रामभाऊ शिंपी हे कुटुंबासहित राहतात. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी, दुपारी १२ वाजता दीपक यांना ९८१०३११८७५ या मोबाइल क्रमांकावरून कॉल आला. बँकेतून बोलत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. तुमच्या क्रेडिट कार्डचे भरपूर पॉईंट जमा झाले आहेत. त्यांचे पैशांत रुपांतरीत करण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर सांगा, असे सांगितले. दीपक शिंपी यांनी विश्वास ठेवून त्यांना क्रेडिट कार्डचा नंबर सांगितला. परंतु, क्रमांक सांगितल्यानंतर काही वेळातच त्यांना ७ हजार रुपयांची ऑनलाईन शॉपिंग केल्याचा मेसेज मोबाइलवर आला. यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी बँकेत जावून लागलीच आपले क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात सात हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

गर्दीत फायदा घेत लांबविला मोबाइल

जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयासमोरील जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी दुपारी २ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली होती. आग विझवण्यासाठी चौधरी यांच्या घरातून मदत करणारे ये-जा करत असतांनाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील दिवाणावर ठेवलेला ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग लागलेल्या इमारतीच्या शेजारीच राहणाऱ्या रोहिणी प्रकाश चौधरी यांच्या घरातून आग विझवण्यासाठी गल्लीतील लोक रोहिणी चौधरी यांच्या घरातून ये-जा करीत होते. या रोहिणी चौधरी यांनी त्यांच्या घरातील मोबाइल चोरट्याने चोरून नेला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज