अ‍ॅपशहर

गळ्यावर सुरा ठेवून वॉचमन दाम्पत्याला लुटले

रायसोनी नगरातील बंगल्यात घुसून पोलिस असल्याची बतावणी करीत दोघा चोरट्यांनी वॉचमनला शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २२) पहाटे सव्वा तीन वाजता घडली. वॉचमनच्या पत्नीने आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले.

Maharashtra Times 24 Jun 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
गळ्यावर सुरा ठेवून वॉचमन दाम्पत्याला लुटले


रायसोनी नगरातील बंगल्यात घुसून पोलिस असल्याची बतावणी करीत दोघा चोरट्यांनी वॉचमनला शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २२) पहाटे सव्वा तीन वाजता घडली. वॉचमनच्या पत्नीने आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले.

शिवसेना महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा मंगला बारी याचा रायसोनी नगरात गट नं ४५८ प्लॉट नं ३६ येथे बंगला आहे. या बंगल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी फर्निचरचे काम सुरू आहे. याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी वॉचमन भिमा बुधा राठोड (रा. उमरा, ता. मुक्ताईनगर) हे वॉचमन म्हणून काम पाहतात. भिमा राठोड हे पत्नी सविता, व दोन मुलांसोबत येथे राहतात.

भिमा राठोड हे पत्नी, मुले व नातेवाईक १३ वर्षांची मुलगी यांच्यासोबत बंगल्यातील खोलीच्या बाहेर झोपले होते. रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास तीस ते चाळीस वयोगटातील दोघे जण तोंडाला रूमाल बांधलेले बंगल्यात शिरले. दोघांपैकी एकाने राठोड यांना आम्ही पोलिस आहोत. तुम्ही कोण, कुठले राहणार, सर्वांचे नाव, पत्ता विचारला. राठोड माहिती देत असताना विचारणाऱ्याने त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गळ्याला धारदार शस्त्र लावून राठोड यांच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र दे, अन्यथा तुझ्या नवऱ्याला ठार मारू, असे सांगितले. प्रचंड घाबरलेल्या सविता राठोड यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. मंगळसूत्र हातात पडताच दोघांनी पैशांची मागणी केली.

दोघा दरोडेखोरांनी पैसे व दागिने घेतल्यानंतर राठोड यांनी पोलिसांनी फोन करू नये म्हणून त्यांच्या मोबाइलमधील सिमकार्ड काढून घेतले. यानंतर चोरट्यांनी बंगल्याच्या चाव्या मागितल्या. अन्यथा तुमच्या मुलीवर बलात्कार करू, अशी धमकी दिली. भेदरलेल्या सविता यांनी चाव्या देताना आरडाओरड करीत जवळच असलेल्या बांधकामाजवळील वॉचमन अजमल राठोड व सदाशिव राठोड यांच्याकडे पळत सुटल्या. राठोड यांचे नातेवाईक व बंगल्यासमोरील रहिवासी पंकज भावसार हे बारी यांच्या बंगल्याजवळ जमले.

भोंदूबाबास पकडले

जळगाव : सेशन कोर्टाच्या मागील गेटजवळ उभ्या असलेल्या अ‍ॅड. दिलीप गायकवाड यांच्या पाकिटातून भोदूबाबाने दोन हजार रुपये चोरून नेले. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच वकिलाने व सोबत असलेल्या अन्य साथीदारांनी लागलीच भोंदूबाबाचा पाठलाग करून त्यांना पकडले.

कन्नड घाटात अपघात

चाळीसगाव : महामार्ग क्र. २११ वरील कन्नड घाटात भरधाव ट्रकने एसटी महामंडळाच्या बसला धडक दिल्याने १६ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ६ वाजता ही

घटना घडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज