अ‍ॅपशहर

क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण

दुकानासमोर कपड्यांचे दुकान लावल्याच्या कारणावरून तरुणासह महिलेस मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि. २६) दुपारी ४ वाजता काँग्रेस भवनाजवळ घडली. शहरातील काँग्रेस भवनाजवळ नदीम शेख कलीम शेख या तरुणाने पंडितजी यांच्या दुकानासमोर कपड्यांचे दुकान लावले.

Maharashtra Times 28 Dec 2017, 4:12 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण


दुकानासमोर कपड्यांचे दुकान लावल्याच्या कारणावरून तरुणासह महिलेस मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि. २६) दुपारी ४ वाजता काँग्रेस भवनाजवळ घडली. शहरातील काँग्रेस भवनाजवळ नदीम शेख कलीम शेख या तरुणाने पंडितजी यांच्या दुकानासमोर कपड्यांचे दुकान लावले. याचाच राग येवून पंडितजी व उमेश प्रभाकर पाटील यांनी नदीम याच्याशी वाद घालून त्यास मारहाण केली. नदीमच्या कपड्यांच्या दुकानाची मालकीन रिचा भेरवाणी या त्याठिकाणी आल्यानंतर त्यांनादेखील दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मात्र, या घटनेमुळे चांगलाच गोंधळ होऊन नागरिकांची गर्दी जमली होती. अखेर नदीम व महिलेने शहर पोलिस स्टेशन गाठत मारहाण करणार्‍या दोघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तर नदीम याच्या तक्रारीवरून उमेश पाटील आणि पंडितजी या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅग लांबविणारा ताब्यात

अहमदनगर येथून खासगी ट्रॅव्हल्सने जळगावला आल्यानंतर आकाशवाणी चौकातील मेगा मार्टजवळ महिला प्रवाशाची विसरलेली बॅग सोमवारी चोरीस गेली होती. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने पोलिस तपासात संशयित लिलाधर दीपचंद सोनवणे यांना ताब्यात घेतले आहे. यावरून तपास करून लिलाधर दीपचंद सोनवणे (वय ५०, रा. महावीर नगर, दूध फेडरेशन) यास बॅगेसह ताब्यात घेतले आहे.

फसवणाऱ्याची चौकशी

शहरातील विविध भागामधील महिलांना बचत गटाच्या नावाखाली एकत्रित करून महिलांची फसवणूक करणार्‍या मनोज आधार नाथबाबा (वय ३१, रा. खंडेराव नगर) यांस एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली आहे. बचत गटाच्या नावाखाली शहरातील महिलांना वेगवेगळी कामे देण्याचे सांगून विविध भागातील २३६१ महिलांकडून गेल्या ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येकी १ हजार रुपये जमा करून पावती दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज