अ‍ॅपशहर

चाकूचा धाक दाखवून धमकावणाऱ्यावर कारवाई

दारूच्या नशेत चाकूचा धाक दाखवून एका दुकानदाराला धमकावणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. खुशाल बापू मराठे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे.

Maharashtra Times 16 Jan 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
चाकूचा धाक दाखवून धमकावणाऱ्यावर कारवाई


दारूच्या नशेत चाकूचा धाक दाखवून एका दुकानदाराला धमकावणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. खुशाल बापू मराठे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. मराठे हा रविवारी (दि. १४) सायंकाळी रामेश्वर कॉलनी परिसरात दारूच्या नशेत लोकांना चाकुचा धाक दाखवत होता. एका स्वीट मार्टच्या दुकान मालकाकडे पैसे मागत होता.

चॉपरसह एकास अटक

सुरेश पुंडलीक कोळी हा कोळी पेठ परिसरात चॉपर घेऊन फिरत असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शनीपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कोळी पेठेत सापळा रचून रविवारी सकाळी सुरेश कोळी यास पकडले. सोमवारी (दि. १५) त्यास न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना मारहाण

जळगाव : भांडण सोडविण्यास गेल्याच्या शुल्लक कारणावरून वेगवेगळ्या घटनेत दोघांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यात पहिल्या घटनेत मेहरूण परिसरातील रहिवासी सचिन भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सनी जाधव यांच्याविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात भादंवी ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी शेख रियाजोद्दीन शेख अल्लाउद्दीन याला आकाश सपकाळे, नरेंद्र अहिरे, नीलेश ठोसर यांनी मारहाण केली. फिर्यादी हे लहान भाऊ फिरोज व रवी यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना तिन्ही संशयितांनी मारहाण केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज