अ‍ॅपशहर

प्रवाशांच्या खिशातील १२ हजार लंपास

मुलाचा डिस्चार्ज झाल्यानंतर बसने घरी जात असताना बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिशातील १२ हजार रुपये चोरट्याने लांबवून नेल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी चार वाजता घडली.

Maharashtra Times 14 Dec 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city crime news
प्रवाशांच्या खिशातील १२ हजार लंपास


मुलाचा डिस्चार्ज झाल्यानंतर बसने घरी जात असताना बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिशातील १२ हजार रुपये चोरट्याने लांबवून नेल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी चार वाजता घडली.

मुक्ताईनगरातील वायला येथील बाजीराव झावरू कोळी यांचा मुलगा माणिकराव बाजीराव कोळी हा आजारी असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा डिस्चार्ज झाल्याने त्यांच्यासह पत्नी सीमाबाई कोळी, वडील बाजीराव कोळी व लहान भाऊ भाऊराव कोळी हे चौघे गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकावर आले. जळगाव-रावेर बसमध्ये चढताना बाजीराव झावरू कोळी यांच्या पॅन्टच्या मागील खिशातून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपयांची रोकड लांबवली. बसमध्ये बसल्यानंतर बाजीराव कोळी यांना खिशातील पैसे चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी लागलीच बसमधून उतरून याबाबतची तक्रार जिल्हापेठ पोलिसात दिली.

दुचाकीस्वार जखमी
पिंप्राळ्यातील सुरज सोपान सुरवाडे वय २८ यांचे मेहुणे सुनील तायडे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे सुरज व त्याचा मित्र शुभम मेघशाम जगताप दोघे दुचाकीने (एमएच १९ -१५०५) त्यांच्या सोबत पाळधी येथे जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते घराकडे येत असतांना जैन इरिगेशन कंपनीजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरजच्या मांडीला उजव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शुभमच्याही हातापायाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत दोघांना रात्री जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज