अ‍ॅपशहर

व्यापारी महामंडळ गाळेधारकांसोबत

शहरातील मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा भाडे आकारणी विषयक प्रश्न राज्य सरकारने लक्ष देऊन सोडवावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि. १२) जळगाव मनपा मार्केट गाळेधारक कोअर कमिटीने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मूक मोर्चाला जळगाव व्यापारी महामंडळाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Maharashtra Times 10 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city market shoppers issue
व्यापारी महामंडळ गाळेधारकांसोबत

शहरातील मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा भाडे आकारणी विषयक प्रश्न राज्य सरकारने लक्ष देऊन सोडवावा, या मागणीसाठी मंगळवारी (दि. १२) जळगाव मनपा मार्केट गाळेधारक कोअर कमिटीने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मूक मोर्चाला जळगाव व्यापारी महामंडळाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलाबाबत नुकताच आमदारद्वयींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. दुसरीकडे मंगळवारी, गाळेधारकांकडून दुपारी १ वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. या आंदोलनाला जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने पाठिंबा देऊन मूक मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी संघटनेचे अध्यक्ष विजय काबरा व सरचिटणीस ललित बरडीया यांनी माहिती दिली. मंगळवारी मूक मोर्चा सकाळी १० वाजता शास्त्री टॉवरजवळून निघेल. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांना निवेदन देण्यात येईल. या मोर्चात जळगाव शहरातील सर्व दुकानदार व व्यापारी वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज