अ‍ॅपशहर

चित्रपटगृहातील उंदरांची महासभेत चर्चा

महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. ९) अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील अतिक्रमण निमू्रलन मोहिमेदरम्यान होणारा वाद, प्रलंबित प्रस्तावांना मंजुरीवरही सदस्यांनी आपले मत मांडले.

Maharashtra Times 10 May 2018, 4:00 am
नगरसेवकांकडून बंदोबस्ताची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city municipal corporation standing meeting issue
चित्रपटगृहातील उंदरांची महासभेत चर्चा


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. ९) अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील अतिक्रमण निमू्रलन मोहिमेदरम्यान होणारा वाद, प्रलंबित प्रस्तावांना मंजुरीवरही सदस्यांनी आपले मत मांडले.

महासभेत बोलताना नगरसेवक अनंत जोशी यांनी शहरातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीरांचा त्रास वाढल्याचे सांगितले. ते म्हणाले की, अनेकदा प्रेक्षकांना उंदीर चावण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. तसेच स्वत: आपणास उंदीर चावल्याने आता खूर्चीवर पाय ठेवून चित्रपट बघत असल्याचे जोशी यांनी सांगितले. चित्रपटगृह चालकांना नोटीस पाठविण्याची मागणी नगरसेवक अनंत जोशी यांनी केली. तसेच या चित्रपटगृहात अनेक ‘बोके व मांजरी’ही चेहऱ्याला रुमाल लावून येत असल्याचा टोला लगावताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

अतिक्रमणात भेदभाव नको
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. यात अपवाद सोडल्यास समान कारवाई होत नसल्याचा आरोप सदस्य नितीन बरडे यांनी केला. समान कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर आरोप होत असल्याची माहितीही बरडे यांनी दिली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांनी, ही कारवाई कोणताही भेदभाव न करता केली जात असल्याचे म्हटले. तसेच भविष्यातदेखील समान कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महासभेत मंजुरी मिळालेले प्रस्ताव...
मुख्य पोस्ट आफिस व रेन्ट-फ्री क्वॉटर्स बळीरामपेठ ही मिळकत केंद्र सरकारची असल्याने या मिळकतीवरील मालमत्ताकराची रक्कम ४ लाख ५१ हजार ४९०, महाराष्ट्र अधिनियमाचे कलम १५२ अन्वये निर्लेखित करण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णयाला मान्यता देण्यात आली. यासह , मनपा आरोग्य विभागाकडील वाहन क्रमांक एमएच १९ एम. ९११९ (कॉम्पॅक्टर) या वाहनावरील खर्च ४४,८०० खर्चास मान्यता देण्यात आली. नागरिक दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मनपा हद्दीतील युनिट क्रमांक २२ अंतर्गत गोपाळपुरा ते कोल्हे गोडावून ते मन्यारवाडा लगत रिटेनिंग वॉल बांधणे व पूल दुरुस्तीसह इतर १० विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज