अ‍ॅपशहर

चर्मकार समाजातर्फे संयुक्त जयंती उत्सव

जिल्हा चर्मकार समाज यांच्यातर्फे शहरातील पत्रकार भवन येथे रविवारी संयुक्त जयंती समारंभ पार पडला. यात गुरू रविदास, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या संयुक्त जयंती उत्सव साजरा झाला.

Maharashtra Times 30 May 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city program celebrates
चर्मकार समाजातर्फे संयुक्त जयंती उत्सव


जिल्हा चर्मकार समाज यांच्यातर्फे शहरातील पत्रकार भवन येथे रविवारी संयुक्त जयंती समारंभ पार पडला. यात गुरू रविदास, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या संयुक्त जयंती उत्सव साजरा झाला.

प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र प्रदेश संघनायक भंते ए. सुगतवंस महाथेरो, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, शंभू पाटील, संदीप ढंढोरे, रमेश साठे, खंडू पवार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कुसूंबाचे पी. आर. आंबेडकर उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रदीप सोनवणे, कपुर पेंटर, एस. एम. गावंडे, सदाशिव हिवाळे, डॉ. सुनील सूर्यवंशी, विजय पवार, सुमित्रा अहिरे यांची उपस्थिती होती. कैलास वाघ यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक संजय बाविस्कर, आभार राजू पवार यांनी मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज