अ‍ॅपशहर

हजारो मतदारांचे ‘प्रभागबदल’

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये अनेक प्रभागांमध्ये तीन ते चार हजारांवर मतदारांचे प्रभाग बदलल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. विरोधकांपाठोपाठ सत्ताधारी खान्देश विकास आघाडीसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावर सोमवारी (दि. ११) महापालिकेत धडक देत आयुक्त चंद्रकांत डांगे यांना याचा जाब विचारला.

Maharashtra Times 12 Jun 2018, 5:00 am
मतदार याद्यांवरून खदखद; सत्ताधाऱ्यांची महापालिकेत धडक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city provisional voters list issue municipal corporation election preparation
हजारो मतदारांचे ‘प्रभागबदल’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये अनेक प्रभागांमध्ये तीन ते चार हजारांवर मतदारांचे प्रभाग बदलल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. विरोधकांपाठोपाठ सत्ताधारी खान्देश विकास आघाडीसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावर सोमवारी (दि. ११) महापालिकेत धडक देत आयुक्त चंद्रकांत डांगे यांना याचा जाब विचारला.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने ५ जून रोजी १९ प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली. यादीत रहिवासाव्यतिरिक्त इतर प्रभागांमध्ये मतदारांचा समावेश असल्याच्या तक्रारी अनेक इच्छुक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होताच विरोधकांसह महापालिकेचे सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. मतदार यादीतील या त्रुटींवरून सोमवारी (दि. ११) सायंकाळी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते सुनील महाजन, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, नगरसेवक नितीन बरडे, श्यामकांत सोनवणे, बंटी जोशी, चेतन शिरसाळे यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन मतदार यादीवर हरकत घेतली. या वेळी त्यांनी आयुक्तांकडे याद्यांमधील गोंधळाबाबत संताप व्यक्त केला.

पुराव्यांवरून संताप
मतदार यादीचा घोळ वाढत असल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला सत्ताधारी खाविआचे व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मतदार यादीत ज्यांनी हरकत घेतली असेल त्यांनी रहिवास पुरावा, सादर केल्यानंतर दुरुस्ती केली जार्इल, असे प्रशासनाने सांगितले. यावर पदाधिकाऱ्यांनी हे काम प्रशासनाचे असल्याने आम्ही पुरावे देणार नाही, अशी भूमिका घेतली.

प्रत्यक्षस्थळी चौकशी शक्य
मतदार यादीत रहिवासाव्यतिरिक्त इतर प्रभागांमध्ये मतदारांचा समावेश असल्याच्या हरकती प्राप्त होत आहेत. हरकत घेतांना संबंधित मतदारांनी रहिवास पुराव्यासह तक्रारी केल्यास प्रत्यक्षस्थळी चौकशी करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या तक्रारी प्राप्त होतील. यानुसार प्रत्यक्ष जावून पाहणी करावी, असे आदेश आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहे. मनपा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडू लागला आहे. सोमवारी, सायंकाळपर्यंत तब्बल ६८९ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज