अ‍ॅपशहर

गाळेधारकांचे बंड

शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि गाळेधारकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत बुधवारी (दि. १४) शहर महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत थकीत भाड्यावर अवाजवी दंड, कुटुंबीयांचा प्रश्न, लिलावाचे धोरण आणि नूतनीकरण यासर्वबाबत सविस्तर चर्चा झाली. आपल्यावरील कारवाईबाबत गाळेधारकांनी दि. २० मार्चपासून ‘बेमुदत दुकाने बंद’चा इशारा दिला आहे.

Maharashtra Times 15 Mar 2018, 4:00 am
शहरातील २३८७ गाळ्यांचा विषय चिघळला; कोअर कमिटीकडून बंदचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city shoppers issue not solved till core committee decides shut down shops from 20 march
गाळेधारकांचे बंड


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि गाळेधारकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत बुधवारी (दि. १४) शहर महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत थकीत भाड्यावर अवाजवी दंड, कुटुंबीयांचा प्रश्न, लिलावाचे धोरण आणि नूतनीकरण यासर्वबाबत सविस्तर चर्चा झाली. आपल्यावरील कारवाईबाबत गाळेधारकांनी दि. २० मार्चपासून ‘बेमुदत दुकाने बंद’चा इशारा दिला आहे.

जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेची बुधवारी (दि. १४) झालेली ही बैठक डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात गाळेधारकांवर महापालिका करीत असलेल्या जाचक कारवाईच्या विरोधात येत्या २० मार्चपासून दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणात शहरातील एकूण २० मार्केटमधील २३८७ गाळ्यांचा विषय चिघळत असून, त्यावर अनेकवेळा चर्चा होऊनही ठोस निर्णय घेतला जात नाही.

विशेष म्हणजे, या सर्व गाळ्यांचे भाडे कराराचे नूतनीकरण, थकीत भाड्यावर पाचपट दंड, ई-लिलावाचे जाचक धोरण यांसह सर्व गाळेधारकांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहचा प्रश्न कायम असल्याची भावनाच या बैठकीतून समोर आली. या वेळी गाळेधारकांच्या कोअर कमिटीचे हिरानंद मंधवाणी, रमेश मताणी, संजय पाटील, युवराज वाघ, राजेश वरयानी, सुरेशआबा पाटील, राजाराम कटारिया, पंकज मोमाया, राजेश पिंगळे, तेजस देपुरा, सुजीत किनगे, बाळासाहेब पाटील, अरुण वसाने यांच्यासह ५०० गाळेधारक प्रतिनिधी उपस्थित होते.

या सर्व मार्केटचा सहभाग

गाळेधारक संघटनेच्या या बंदमध्ये शहरातील फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, शास्त्री टॉवरखालील दुकाने, वालेचा मार्केट, महात्मा गांधी मार्केट, नानीबाई अग्रवाल व्यापारी संकुल, धर्मशाळा मार्केट, रेल्वेस्टेशनजवळील मार्केट, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मार्केट, गेंदालाल मिल मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, जुने शाहू मार्केट, भोईटे मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, भास्कर मार्केट, चौबे मार्केट, शिवाजीनगर हॉस्पिटलमधील दुकाने, शाहू महाराज हॉस्पिटलमधील दुकाने, लाठी शाळेतील सभागृह, बी. जे. मार्केट (जुने) येथील गाळेधारक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, गाळेधारकांना अवाजवी भाडे व दंडाची आकारणी, दुकानांच्या लिलावासाठी ई-लिलावाची अन्यायकारक अंमलबजावणी होत असल्याच्या निषेधार्थ बुधवार, १४ मार्चला सकाळी गाळेधारकांचा मूक मोर्चा भास्कर मार्केटपासून काढण्यात येणार होता. परंतु आंदोलनास व्यापक स्वरुप मिळवून देण्याच्या दृष्टीने मोर्चा स्थगित करण्यात आला, अशी माहिती भास्कर मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज