अ‍ॅपशहर

गाळेधारकांच्या याचिकेवर ५ मे रोजी कामकाज

जळगाव मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मनपा प्रशासनाने बजावलेल्या ८१ ब या आदेशाच्या विरोधात जिल्हा न्यायालयात सहा मार्केटमधील १८७ गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ५ मे रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

Maharashtra Times 29 Apr 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city shoppers pil hearing at court on 5th may
गाळेधारकांच्या याचिकेवर ५ मे रोजी कामकाज

जळगाव मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मनपा प्रशासनाने बजावलेल्या ८१ ब या आदेशाच्या विरोधात जिल्हा न्यायालयात सहा मार्केटमधील १८७ गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ५ मे रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेली याचिकेवर शुक्रवारी, न्या. सविता बारणे यांच्या न्यायालयात कामकाज होणार होते. मात्र, शुक्रवारी याबाबत कोणतेही कामकाज झाले नाही. गुरुवारी, महात्मा फुले, सेंट्रल फुले व महात्मा गांधी मार्केटमधील गाळेधारकांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. तर दुसऱ्या दिवशी जुने छत्रपती शाहू महाराज मार्केट, नवीन छत्रपती शाहू महाराज मार्केट,जुन्या बीजे मार्केट, गेंदालाल मिल मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट व धर्मशाला मार्केटमधील १८७ गाळेधारकांच्या याचिकेवर कामकाज होणार होते. मनपातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके तर गाळेधारकांतर्फे अ‍ॅड. दिलीप मंडोरे, अ‍ॅड. तपन थत्ते हे काम पाहत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज