अ‍ॅपशहर

उस्मानिया पार्कमध्ये कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू

शहरातील शिवाजीनगरातील उस्मानिया पार्कमध्ये नागरिकांनी पाळलेल्या कोंबड्यांना रोगाची लागण होऊन त्या मृत्युमुखी पडल्या होत्या. दरम्यान, या मृत कोंबड्यांना नेमक्या कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी त्या शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली.

Maharashtra Times 21 Jun 2018, 4:00 am
शवविच्छेदनातून मिळणार रोगाची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city usmaniya park area suspicious death of the hens
उस्मानिया पार्कमध्ये कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील शिवाजीनगरातील उस्मानिया पार्कमध्ये नागरिकांनी पाळलेल्या कोंबड्यांना रोगाची लागण होऊन त्या मृत्युमुखी पडल्या होत्या. दरम्यान, या मृत कोंबड्यांना नेमक्या कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी त्या शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली.

शहरातील बहुतांश नागरिक आपल्या घरी कोंबड्या पाळत असतात. दरम्यान, या कोंबड्यांना कोणत्या तरी आजाराची लागण झाली असून, त्या अचानक दगाविण्याचे प्रमाण येत्या दोन दिवसांत वाढले आहे. यामध्ये शहरातील उस्मानिया पार्कमधील रहिवाशांनी पाळलेल्या २५ कोंबड्या व ६ कबूतरे अचानक दगावली आहेत. त्यामुळे कोंबड्या व कबूतरांवर अज्ञात रोगाचा प्रार्दूभाव झाला आहे. अचानक कोंबड्या दगावल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी (दि. २०) मनपातील आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक शंकर डाबोरे, एस. डी. बडगुजर यांनी त्या भागाची पाहणी केली. या वेळी त्यांना मृत झालेल्या कोंबड्या आढळून आल्या आहेत. या कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी त्या पशूवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहेत.

अहवालानंतर कारण कळणार
अचानक दगावलेल्या कोंबड्यांमुळे पूर्ण परिसरात रोगराई पसरू नये. यासाठी परिसरातील नागरिकांनी मृत झालेल्या कोंबड्या व कबूतर हे त्या भागातून वाहणाऱ्या नाल्यात फेकून देत त्याची विल्हेवाट लावली आहे. उस्मानिया पार्कमध्ये अचानक दगाविलेल्या कोंबड्या पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेनासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या अहवालावरून कोंबड्या कोणत्या रोगामुळे मृत झाल्या आहेत, याची माहिती मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज