अ‍ॅपशहर

जलशुद्धीसाठी हवा फिल्टर प्लँट

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी उमाळा शिवारातील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जावून पाहणी केली. दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी चारकोल कार्बन प्लँट बसविण्याची गरज पाहणीनंतर जोशी यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Times 22 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon city water filter center need carbon charcoal plant
जलशुद्धीसाठी हवा फिल्टर प्लँट

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी उमाळा शिवारातील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जावून पाहणी केली. दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी चारकोल कार्बन प्लँट बसविण्याची गरज पाहणीनंतर जोशी यांनी व्यक्त केली आहे.

शहरात वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात दुर्गंधीयुक्त व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा वितरित होऊ लागला आहे. जोशी यांनी पहाटे ४ वाजता सानेगुरूजी कॉलनीत जावून पाण्याचे नमुने घेतले. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील सँडबेड (वाळू) पाच वर्षापासून बदलवले नाही. तसेच एक सँडबेड बंद असल्याची माहिती त्यांना मिळाली. जलशुद्धीकरण केंद्रात तुरटी, ब्लिचिंग, क्लोरिन यांचा योग्य प्रमाणात वापर करून मिश्रण तयार केले जाते. परंतु, जलशुद्धीकरण केंद्रातील मिश्रण यंत्र गेल्या वर्षभरापासून बंद आहे. याबाबत प्रशासनाने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जोशींनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज