अ‍ॅपशहर

लंडनच्या परिषदेत जळगावच्या डॉक्टरांचा सहभाग

हृदयविकाराच्या निवारण व प्रतिबंधासाठी आयुर्वेदीय उपचार अत्यंत लाभदायी ठरत आहे. या विषयावर डॉ. महेश बिर्ला यांनी लंडन येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केला. या परिषदेत डॉ. आदित्य जहागिरदार यांनीही सहभाग घेतला.

Maharashtra Times 20 Apr 2017, 4:00 am
लंडनच्या परिषदेत जळगावच्या डॉक्टरांचा सहभाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon doctors involved in the london conference
लंडनच्या परिषदेत जळगावच्या डॉक्टरांचा सहभाग

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

हृदयविकाराच्या निवारण व प्रतिबंधासाठी आयुर्वेदीय उपचार अत्यंत लाभदायी ठरत आहे. या विषयावर डॉ. महेश बिर्ला यांनी लंडन येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केला. या परिषदेत डॉ. आदित्य जहागिरदार यांनीही सहभाग घेतला.

इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाऊंडेशन (लंडन), ऑल इंडिया आयुर्वेदिक काँग्रेस, न्यू दिल्ली आणि इंटरनॅशनल आयुर्वेद अकादमी, पुणे यांच्या वतीने लंडन येथे १ ते ३ एप्रिल २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारतासह ५५ देशांचे ३७० डॉक्टर प्रतिनिधी सहभागी झाले होते.

युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार

भारतातर्फे सहभागी झालेल्या डॉक्टर प्रतिनिधींमध्ये जळगाव येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. महेश बिर्ला व डॉ. आदित्य जयंत जहागिरदार यांचा समावेश होता. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत विभिन्न देशांतून आलेल्या प्रतिनिधींनी आयुर्वेद चिकित्सेसंदर्भात विविध शोधनिबंध सादर केले. भारत ही आयुर्वेदाची जननी असूनही भारतपेक्षा युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि अंगिकार अधिक वेगाने होत असल्याचे डॉ. महेश बिर्ला यांनी सांगितले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. बिर्ला यांनी केस स्टडीसह शोधनिबंधाचे सादरीकरण केले. तसेच डॉ. आदित्य जहागिरदार यांनी आर्युवेदातील योगाचे महत्त्व या शोधनिबंधाचे सादरीकरण केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज