अ‍ॅपशहर

‘जळगाव फर्स्ट’तर्फे आरोग्य जागृती

महापालिका दरमहा शहराच्या साफसफाईसाठी दीड कोटी रुपये खर्च करते. तरी, देखील समाधानकारक साफसफाई शहरात होतांना दिसत नाही. घाणीचे साम्राज्य झाले आहे. डासांचे प्राबल्य शहरात वाढले आहे.

Maharashtra Times 18 Nov 2017, 4:44 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon frist cleaning
‘जळगाव फर्स्ट’तर्फे आरोग्य जागृती


महापालिका दरमहा शहराच्या साफसफाईसाठी दीड कोटी रुपये खर्च करते. तरी, देखील समाधानकारक साफसफाई शहरात होतांना दिसत नाही. घाणीचे साम्राज्य झाले आहे. डासांचे प्राबल्य शहरात वाढले आहे. यासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी जळगाव फर्स्टतर्फे आरोग्य अभियान सुरू केले आहे. त्याअतंर्गत नुकतीच त्रिमूर्ती फार्मसी कॉलेजमध्ये आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात आली.

यावेळी डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत माहिती दिली. डेंग्यू प्रतिबंधासाठी करावयाचे उपाय सांग‌ितले. पाण्यामार्फत व डासामार्फत पसरणाऱ्या रोगांनी शहरभर उच्छाद मांडला आहे. जवळपास प्रत्येक घरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर विषाणूजन्य तापाचे रुग्ण आढळत आहेत. अनेक जळगावकरांचा दुर्दैवी मृत्यूदेखील अलीकडच्या काळात या आजारांनी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

फक्त महापालिका प्रशासनाच्या नावाने ओरड न करता, शहराच्या प्रमुख भागात जाऊन तेथील नागरिकांना या आजारांचा प्रसार कसा होतो, त्यांचे लक्षणे, त्यांचा उपचार व प्रतिबंध कसा करावा यासाठी ‘जळगाव फर्स्ट’ आरोग्य जागृती मोहीम रविवारपासून राबविली जात आहे. आरोग्य रक्षणाच्या योगदानासाठी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज