अ‍ॅपशहर

जिल्हा बँकेची बदनामी थांबवावी!

बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात केलेले आरोप केवळ राजकारणाने प्रेरीत आहेत. या आरोपांमुळे बँकेची विश्वासार्हता सभासदांमध्ये कमी होईल. चौधरी यांनी बँकेची बदनामी थांबवावी, असा इशारा सेंट्रल को. बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हेमंत साळुंखे यांनी पत्रकार परिषदेद्वारा दिला आहे.

Maharashtra Times 1 Oct 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon jailha bank
जिल्हा बँकेची बदनामी थांबवावी!

बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात केलेले आरोप केवळ राजकारणाने प्रेरीत आहेत. या आरोपांमुळे बँकेची विश्वासार्हता सभासदांमध्ये कमी होईल. चौधरी यांनी बँकेची बदनामी थांबवावी, असा इशारा सेंट्रल को. बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हेमंत साळुंखे यांनी पत्रकार परिषदेद्वारा दिला आहे.

हेमंत साळुंखे यांनी सांगितले की, कैलास चौधरी यांनी जिल्हा बँकेला मिळालेल्या अ वर्गाबाबत जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत त्यांनी स्वतःच नाबार्डकडे चौकशी केली पाहिजे. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांवरच खुर्च्या फेकण्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. त्यांनी त्यांचे राजकारण करावे, पण त्यात बँकेचे नुकसान करू नये. बँकेने दाखल केलेल्या दरोड्याचा गुन्हाबाबत चौधरींनी कोर्टात आपला लढा लढावा. त्यांची एक रुपयांची ठेव बँकेत नसताना शेतकऱ्यांचा प्रश्नावर त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचा आरोप सेंट्रल को बॅक कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी सुनील पवार यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज