अ‍ॅपशहर

जिल्हा दूधसंघात वेतनवाढ

जिल्हा दूध संघ अतिशय कमी मनुष्यबळावर टिकून आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना ५ ते १० वर्ष झाली आहेत अशा ४० आणि ज्यांना १० व त्यापेक्षा अधिक काळ झाला आहे, अशा ४६ कर्मचाऱ्यांना २० ते २५ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra Times 26 Jun 2016, 1:18 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon jilha doodh sangha
जिल्हा दूधसंघात वेतनवाढ


जिल्हा दूध संघ अतिशय कमी मनुष्यबळावर टिकून आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना ५ ते १० वर्ष झाली आहेत अशा ४० आणि ज्यांना १० व त्यापेक्षा अधिक काळ झाला आहे, अशा ४६ कर्मचाऱ्यांना २० ते २५ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची सभा शनिवारी, खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, जिल्हा दूध संघाने उत्पादनांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी सुरत (गुजरात) व मध्य प्रदेशात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे जिल्हा दूध संघाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षभर नुकसान टाळण्यासाठी महानंदा डेअरीला दूध पुरवठा करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी १ जुलैपासून पशुखाद्याच्या दरात प्रतिकिलो ३.३० रूपये दराने वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती मंदाकिनी खडसे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज